गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

खराब किंवा लिहिलेल्या नोटांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण

बँका खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्विकारण्यास नकार देऊ शकत नाही असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा काढावा असंही आरबीआयने सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेकडे गेल्या काही दिवसांत बँका रंग लागलेल्या तसंच ज्यांच्यावर काही लिहिलं आहे, धुतल्याने रंग उडाला आहे अशा नोटा स्विकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यामध्ये खासकरुन 500 आणि 2000 च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयने परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्विकारण्याचा आदेश दिला आहे. 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे की, नोटांवर लिहिण्यासंबंधी जो आदेश देण्यात आला होता तो बँक कर्मचा-यांसाठी होता. त्यांनी नोटांवर काही लिहू नये असं सांगितलं होतं. अनेक बँक कर्मचा-यांना नोटांवर लिहिण्याची सवय लागल्याचं लक्षात आल्यानंतर आरबीआयने हा आदेश काढला होता. अशाप्रकारे नोटांवर लिहिणे आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीविरोधात आहेत. आरबीआयने सरकारी कर्मचारी, संस्था आणि सामान्यांना नोटांवर काही न लिहिता त्यांना व्यवस्थित ठेवण्याचं आवाहन केलं आहे.