बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (10:40 IST)

अनारक्षित श्रेणीत तिकीट मिळण्यासाठी रेल्वेचे नवे अँप

रेल्वेने प्रवास करणार्‍यांसाठी एक गुडन्यूज आहे. ज्यांच्याकडे आरक्षण श्रेणीतील तिकीट नसेल आणि तिकीट खिडकीवर रांगा, यामुळे रेल्वेचे तिकीट मिळत नाही. आता त्याची चिंता मिटणार आहे. रेल्वे अनारक्षित श्रेणीत तिकीट मिळण्यासाठी रेल्वे एक मोबाइल अँपचा वापर करणार आहे.

रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले, मोबाइल आधारित पेपरलेस अनारक्षित टिकटिंग अँप्लिकेशनचा वापर करून तिकीट बुक करू शकता. तसेच तिकिटाची प्रिंट आवश्यक नाही. तर तिकिटाची सॉफ्टकॉपी आपल्या स्मार्टफोन, मोबाइलवर दाखवू शकता. पेपरलेस टिकटिंग प्रणाली रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचविल. तिकीट खिडकीवर रांग लावायची आता गरज लागणार नाही. हे अँप अँड्रॉइड आधारित मोबाइल फोनवर गुगल अँपस्टोरच्या माध्यमातून हे अँप डाऊनलोड करू शकता. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला रेल्वे ई-वालेट होण्यासाठी एक नोंदणीकृत आयडी मिळेल.

या अधिकार्‍याने सांगितले, प्रवाशांना ई-वालेट टॉपअप करण्यासाठी तिकीट खिडकीवर पर्याय उपलब्ध असेल. तसेच रेल्वेच्या संकेत स्थळावर क्रेडिट या डेबिट कार्डचा उपयोग करू शकता.