गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2016 (11:26 IST)

अनेक गोष्टी झाल्या महाग

व्हॅटमध्ये 1 टक्का वाढ दर 12.5 टक्क्यांवरुन 13.5 टक्के 
 
राज्यातील मुल्यवर्धित करांतर्गत स्टैंडर्ड कराचा दर 12.5 टक्क्यांवरुन 13.5 टक्के तर निम्न कराचा दर 5.5 टक्क्यांवरुन सहा टक्के करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तर व्हॅटमध्ये 1 टक्का वाढ झाली आहे. त्यामुळे आता दुचाकी आणि मोटार वाहने, वाहनांचे सुटे भाग, पेट्रोलियम वस्तू जसे वंगण, ऑईल सोबत अनेक गोष्टी महाग होणार आहेत.  तर सोबतच इलेक्ट्रॉनिक वापरण्याच्या वस्तू जसे टी.व्ही, फ्रिज, आणि फर्निचर वस्तू, शोभेच्या वस्तू यांचा समावेश आहे.
 
 व्हॅट अंतर्गत 5.5टक्के कराची जो कर आकारला जाणार आहे.वस्तूंवर आता 6 टक्के कर आकारणी होणार आहे. प्रमुख  वस्तूंमध्ये विटा, बांबू, सायकल, नॉन फेरस मेटल, पेपर, होजियरी वस्तू, मसाले, मिठाई आणि फरसाण, प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्या, औषधे, खेळाचे साहित्य,तंत्रज्ञान वस्तू, दूधाची भुकटी, छत्र्या, लिखाणाचे साहित्य यांचा समावेश आहे.
 
करमाफी असलेल्या जीवनावश्यक वस्तूं शेतीस उपयुक्त अवजारे, दिव्यांग व्यक्तींसाठीची साधने, पुस्तके, जनावरे, कुक्कुट आणि मासे यांचे खाद्य, गहू, ज्वारी, तांदूळ आणि त्याचे पीठ, डायलिसीस आणि कॅन्सरवरील औषधे, दूध, भाजीपाला, फळे, फुले, जैविक खते, सर्व प्रकारचे सीडस्, साखर, मिरची, हळद, नारळ, सोलापुरी चादर आणि टॉवेल, मनुके बेदाणे, अगरबत्ती यांचा किमतीत कोणताही समवेश नाही.