गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 28 फेब्रुवारी 2015 (11:32 IST)

अर्थसंकल्प ‘कॉमन मॅन’ला अनुसरुनच : जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यास सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प ‘कॉमन मॅन’ला लक्षात घेऊनच केला असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.

महागाईने पोळलेल्या देशातील सर्वसामान्यांना मोदी सरकार ‘अच्छे दिन’ दाखविणार का, याकडे सार्‍यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आर्थिक पाहणी अहवाहलात डिझेलच्या किमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मयार्दा वाढविणे, इंधनाच्या दरात झालेली कपात काही प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचविल्याने महागाई काही प्रमाणात नियंत्रणात येण्याच्या रूपाने दिसून येईल, असे यात नमूद केले आहे. आता लक्ष लागून राहिले आहे ते अर्थसंकल्पात काय दडले आहे, याकडे.