गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आल्टो देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार

नवी दिल्ली- वाहन निर्माता कंपनी मारुति सुजुकीची लहान कार ‘ऑल्टो’ देशातील सर्वाधिक ‍लोकप्रिय कार बनली. लाँचिंगनंतर घरगुती बाजारात आल्टोची 30 लाखाहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे.
 
कंपनी सूत्रांप्रमाणे 15. 5 वर्ष आधी लाँच झालेली ऑल्टो देशातील पहिली आणि एकमेव अशी कार आहे ज्यांची इतकी विक्री झाली आहे. मागील 10 वर्षांपासून ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.
 
कंपनीचे कार्यकारी निदेशक आरएस कलसी यांनी म्हटले की ऑल्टो परिवर्तित भारताचे प्रतीक आहे. कमी इंधन वापर, कामगिरी, आकर्षक किंमत आणि ईझी मेंटेन्स याचे वैशिष्ट्ये आहेत तसेच याचे जिप्पी आणि स्पोर्टी लुक ग्राहकांना आकर्षित करतं. ऑल्टो एअरबॅग व ऑटो गियर शिफ्ट सारख्या फीचर्ससह प्रस्तुत केली जात आहे. यामुळे याची लोकप्रियता वाढत आहे. 
 
ऑल्टोला श्रीलंका, अल्जीरिया, चिली, यूके व नेदरलँड्ससह 70 हून अधिक देशांमध्ये निर्यात केलं जातं. आतापर्यंत 3.8 लाख हून अधिक वाहन निर्यात केले गेले आहेत. 
 
उल्लेखनीय आहे की या कार ने सप्टेंबर 2000 मध्ये लाँचिंगनंतर ऑक्टोबर 2003 मध्ये 1 लाख युनिट विक्रीचे लक्ष्य प्राप्त केले होते.