मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एक लीटरमध्ये 100 किमी चालणारी कार

एका मध्यम हैचबॅक कारच्या समतुल्य रेनॉल्टची 'इयोलॅब' कार 100 किमी प्रति लीटर एवरेज देते. कारमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन आहे जे 76 पीएसची पॉवर उत्पन्न करतं. यात 54 पीएसची इलेक्ट्रिक मोटर लागलेली आहे. यात लागलेली 6.7 kWh लिथियम आयन बॅटरीमुळे 60 किमीचा प्रवास करू शकते. पेट्रोल इंजिन व इलेक्ट्रिक मोटर मिळून 200 एनएम टॉर्कसह 141 बीएचपी शक्ती प्रदान करतं. गाडीची टॉप स्पीड 118.4 किलोमीटर प्रति तास आहे.


कारमध्ये दोन मोड्स आहे. पहिला 'वीकडे' ज्यात कारच्या उत्सर्जनाकडे लक्ष दिले जाते आणि दुसरा आहे 'वीकेंड' ज्यात कारच्या दोन्ही यूनिटला एकत्र करून मॅक्सिमम पॉवर आउटपुटवर लक्ष केंद्रित केलं जातं. ही कार तयार करण्यासाठी तीन पिलर, मॅग्नेशियमची छत, ऍल्यूमिनियमचे दारं आणि थर्मोप्लास्टिक बोनट वापरले आहेत. कार 995 किलो वजनी आहे.