गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

एचसीएल 300 अभियंत्यांची भरती करणार

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असलेल्या एचसीएलने ब्राझीलमधील आयटी केंद्राच्या विकासासाठी आगामी तीन वर्षांमध्ये 300 अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार लॅटीन अमेरिकी बाजारात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी कंपनीने आयटी विकास केंद्राची स्थापना केली आहे.

उत्तर, लॅटीन अमेरिका आणि युरोपातील आपल्या ग्राहकांना या केंद्राच्या माध्यमातून सेवा पुरवण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.