शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|

एनिमेशन उद्योगाचा विकास दर घसरणार?

आगामी काळात एनिमेशन आणि गेमिंग उद्योगाचा विकास दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आय टी कंपनी असलेल्या नास्कॉमने याविषयीचा एक अहवाल प्रकाशित केला असून, यात ही शक्यता वर्तवली जात आहे.

कंपनीचे अध्यक्ष सोम मित्तल यांनी या अहवालाची घोषणा केली. आगामी काळात या क्षेत्राचा विकास दर 22 टक्के ते 49 टक्क्यांवर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी नास्कॉमने गेमिंग उद्योग 1,06 कोटी डॉलरची कमाई करेल असा अंदाज वर्तवला होता, परंतु आता या उद्योगात केवळ 83 कोटीची कमाई होण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.