गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

ऑनलाईन मिळणार जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट

मुंबई- रेल्वेच्या तिकिटासाठी आता लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही. रिझर्वेशनप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवरूनच जनरल तिकिट बुक करू शकणार आहात. आयआरसीटीसी लवकरच जनरल तिकिट देखील मोबइलवर उपलब्ध होणार आहे.
 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही घोषणा केली. याची सुरुवात रेल्वेवरील काही स्थानकांवरून करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे ही माहिती गोळा करत आहे की कोणत्या स्थानकांवरून लोकं अधिक प्रमाणात जनरल तिकिट घेतात.
 
आतापर्यंत लोकं फक्त रिझर्वेशन तिकिटच ऑनलाईन बुक करू शकत होते. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट देखील आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्याची तयारी होत आहे.