गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 26 सप्टेंबर 2011 (12:55 IST)

चलनवाढ, आर्थिक अनिश्चिततेमुळे नोकरभरतीत घट

जागतिक अर्थव्यवस्थेमधील दोलायमान स्थिती व चलनवाढीच्या वाढत्या दबावाच्या पृष्ठभूमीवर दूरसंचार, विमा आणि रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये होणार्‍या नोकरभरतीमध्ये घट झाल्यामुळे भारतीय नोकरभरतीच्या बाजारात मंदीच वातावरण पसरले आहे.

जॉब पोर्टल नोकरी डॉट कॉमचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश ओबेरॉय यांनी सांगितले, की सध्या भारतीय रोजगार बाजारात मंदीची लाट पसरण्याची शक्यता असून, कंपन्यांमार्फत होणारी नोकरभरती मंदावली आहे.