गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 18 जून 2016 (09:32 IST)

जेटलींमुळेच काळा पैसा परत आणण्यात अपयश

देशातील आर्थिक घडामोडींसह रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याविरोधात सातत्याने टीका-टिप्पणी करणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काळ्या पैशांच्या मुद्दय़ावरून आता थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘अरुण जेटली यांच्यामुळेच देशाबाहेर असलेला काळा पैसा परत आणण्यात अपयश येत आहे,’ असा आरोप स्वामी यांनी केला आहे.
 
विदेशी बँकांमध्ये भारतीयांचे 1 लाख 20 हजार अब्ज रुपये जमा आहेत. कर चुकवण्यासाठी धनाढय़ भारतीयांनी ते देशाबाहेर ठेवले आहेत. हा सगळा पैसा परत आणण्याची गरज आहे. त्यासाठी ‘टॅक्स हेवन्स’मध्ये जमा असलेल्या खजिन्याचे राष्ट्रीयीकरण करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील याच मताचे आहेत. वकील देशातील करदात्यांची संख्या 10 कोटींवर नेण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदी यांनी अधिकार्‍यांपुढे ठेवले आहे. मात्र, स्वामी यांनी याउलट मत मांडले आहे. बचत दर वाढविण्यासाठी आणि वेगाने आर्थिक विकास साधण्यासाठी इन्कम टॅक्स पूर्णपणे रद्द करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, राष्ट्रीय बचत दर 33 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. तो 40 टक्क्यांवर नेण्याची गरज आहे. बचत दर वाढल्यास विकासासाठी भांडवल उपलब्ध होईलच, शिवाय इन्कम टॅक्स रद्द केल्यामुळे होणार्‍या 2 हजार अब्जांच्या नुकसानीची भरपाईसुद्धा होईल. 
 
असलेल्या अरुण जेटली यांना विदेशात काळा पैसा ठेवणार्‍यांची चांगली माहिती आहे.