शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: दिल्ली , शुक्रवार, 8 एप्रिल 2016 (12:10 IST)

निता अंबानी शक्तीशाली बिझनेस वुमन

‘फोर्ब्स’ने यंदा जाहीर केलेल्या अशियातील शक्तीशाली ‘बिझनेस वुमन २०१६’च्या यादीत आठ भरातीय महिलांनी बाजी मारली आहे. या यादीमध्ये रिलायन्स फौंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानी यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे.

अशियातील भारत, चीन, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, व्हीएतनाम, थायलंड, हॉगकॉग, जपान, सिंगापूर, फिलोपिया, न्यूझीलंड आदी देशातील ५० महिलांचा या यादीमध्ये समावेश आहे.   निता अंबानी यांनी रिलयान्स उद्योग समुह आणि रिलयान्स फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल ‘फोर्ब्स’ने घेतली असून त्यांना यंदाच्या यादीत प्रथम  क्रमांक मिळाला आहे. निता अंबानी या रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची सुत्री हाती घेताना अरूंधती भट्टाचार्य (वय ६०) यांच्यापुढे मोठी आव्हाने होती. अशा परिस्थितीतही त्यांनी बँकेला मोठ्या प्रमाणात फायदा करून देत, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवला आहे.