शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 1 जून 2016 (11:02 IST)

पेट्रोल, डिझेल महागलं

पेट्रोलचे दर प्रति लिटर 2.58 रुपयांनी वाढले असून डिझेल 2.26 रुपयांनी महागलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली असून दोन महिन्यातील ही चौथी दरवाढ आहे. यापूर्वी 17 मे रोजी पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं होतं.  तर त्या याआधी
30 एप्रिलला पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.06 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 2.94 रुपयांनी  वधारले होते. तसंच 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते.