गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पेट्रोल, डिझेल स्वस्त

नवी दिल्ली- महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी विशेषत: वाहनधारकांसाठी खूशखबर आहे. पेट्रोल आणि डिझलेच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटरला 1 रुपया 42 पैसै, तर डिझेल 2 रुपये 01 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यानुसार नवे दर रविवारी मध्यरात्रीनंतर लागू झाले आहेत.
 
15 जुलैला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटरमागे 89 पैसे, तर डिझेलच्या दरात 49 पैशांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची समीक्षा करतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय दराच्या आधारावर इंधनदरातील कपात अथवा वाढीबाबत निर्णय घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती घसरल्याच्या परिणामी तेल कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.