गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

पेट्रोल स्वस्त झाले मात्र डिझेल महागले

WD
महागाईने हैराण झालेल्या सामान्य जनतेला दिवाळीच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर एक रुपया 15 पैशांनी स्वस्त झाले आहेत. मात्र डिझेल 50 पैशाने महागले आहे. गुरुवार मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आहे. तेल कंपण्यांच्या या निर्णयामुळे मात्र देशात 'कही कुशी, कही गम', असे चित्र पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमंती स्थिरावल्या आहेत. त्यात डॉलरच्या तुलनेत रुपयातही सुधारणा होत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करण्‍यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी एक ऑक्टोबरला पेट्रोलच्या दरात तीन रुपये पाच पैशांनी कपात करण्यात आली होती. त्यामुळे या महिन्याभरात पेट्रोल जवळपास साडे चार रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र डिझेलच्या दराबाबत सरकारचीच कसरत सुरु आहे. डिझेलवरची सबसीडी कमी करता यावी, म्हणून ते दर महिन्याला लिटरमागे 50 पैसे वाढवण्याची मुभा तेल कंपन्यांना देण्यात आली असली तरी प्रतिलिटर 9 रुपये 58 पैशाचा तोटा सहन करावा लागत आहे.