शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , बुधवार, 17 डिसेंबर 2014 (11:44 IST)

भारत काळ्या पैसेवाल्यांच्या यादीत जगामध्ये तिसरा

देशात आणि देशाबाहेर सर्वाधिक काळा पैसा असलेला भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे, असा निष्कर्ष ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेने (थिंक टँक) काढला आहे.
 
‘ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी’ने विविध देशांशी संबंधित काळ्या पैशांच्या संदर्भात एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, 2003 ते 2012 या काळात भारतामधून सुमारे 28 लाख कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत. एकटय़ा 2012 मध्ये तब्बल 6 लाख कोटी रुपये विविध मार्गाने परदेशात पाठविण्यात आले आहेत.
 
काळ्या पैशांच्या व्यवहारात चीन व रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत. चीनचे 249.57 अब्ज डॉलर्स तर रशियाचे 122.86 अब्ज डॉलर्स काळ्या पैशांच्या रुपात जगाच्या बाजारात फिरत आहेत. करचुकवेगिरी, गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या मार्गाने परदेशात लपविण्यात आलेल्या काळ्या धनात भारताचा हिस्सा एकूण दहा टक्के इतका आहे. या काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे.