शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 18 जुलै 2016 (10:43 IST)

महागाईच्या दराला कमी कसे म्हणता? : डॉ. रघुराम राजन

चलनवाढ आणि महागाई आता आटोक्यात आली असल्याने रिझर्व्ह बँकेने व्याजाचे दर आणखी कमी करावेत असे म्हणणाऱ्यांनी सध्याच्या महागाईच्या दराला कमी कसे म्हणता येईल, ते आधी स्पष्ट करावे असे सांगत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी निंदकांना सडेतोड उत्तर दिले.

व्याजाचे दर चढे ठेवल्याने विकासाचा वेग खुंटला, असा दोष देणाऱ्यांचा संदर्भ देऊन डॉ. राजन म्हणाले की, पतधोरण ठरविताना विकासापेक्षा चलनवाढ रोखण्यावर नको तेवढा भर दिला या टिकेला काही अर्थशास्त्रीय आधार नाही. मी या टिकेकडे केवळ चर्चा-संवाद म्हणूनच पाहतो व त्याकडे फारसे लक्ष देत नाही. विकासाला चालना देण्यात आम्ही कमी पडलो अशी चर्चा सातत्याने सुरु असते. त्याला कोणताही अर्थशास्त्रीय आधार नाही.