शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2015 (10:56 IST)

रिटि्वटसोबत तुमची कमेंटही टाईप करा

मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट टि्वटर नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवं काहीतरी आणत असतं. आता टि्वटरनं असं फीचर आणलं आहे ज्याद्वारे एखादा टि्वट जेव्हा आपण रिटि्वट करतो त्यावेळी आपल्याला त्या टि्वटबद्दल आपले मतही मांडता येणार आहे. याआधी केवळ रिटि्वट करताना मत मांडण्यासाठी पुरेसे कॅरॅक्टर उपलब्ध नसायचे.

एखादा टि्वट रिटि्वट करत असताना एक तर तो डायरेक्टली रिटि्वट करता यायचा किंवा तो टि्वट कोट करून रिटि्वट करता येत होता, मात्र त्यावेळी आपले मत मांडण्यासाठी अगदीच कमी कॅरेक्टर उपलब्ध असायचे. मात्र आता रिटि्वट वेळी तुम्हाला तब्बल 116 कॅरेक्टरमध्ये तुमचीही कमेंट किंवा मत मांडण्याची सुविधा टि्वटरने उपलब्ध करून दिली आहे. टि्वटरने अपडेट केलेल्या या फीचरचा टि्वटरकरांकडून जोरदार स्वागत झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी टि्वटरच्या या नव्या फीचरचा पुरेपूर वापर केल्याचे टि्वटरवर दिसले. दरम्यान, टि्वटरचे ‘रिटि्वट विथ कमेंट’ हे नवं फीचर सध्या टि्वटरच्या वेबसाइटवर आणि आयफोन अँपमध्येच उपलब्ध होणार आहे.

मात्र काही दिवसांतच हे फीचर अँड्रॉईड यूजर्ससाठीही उपलब्ध केले जाणार आहे.