शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By wd|
Last Modified: कोलकाता , सोमवार, 7 जुलै 2014 (15:53 IST)

'रिलायन्स' सहा हजार कर्मचार्‍यांची कपात करणार

रिलायन्स कम्युनिकेशन जुलैअखेर सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांची कपात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशनने 37 टक्के कर्मचारी कपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे. कॉस्ट कटिंग आणि नफा वाढवण्यासाठी कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी लवकरच दोन सर्व्हिस प्रोव्हायडर्ससोबत मोठा व्यवहार करणार आहे. आपला बीपीओ आउटसोर्स करणे तसेच सर्व्हिस ऑपरेशन्स शेअर करण्‍यासाठी 700 कोटी रुपयांचे व्यवहार करणार आहे. या मोठ्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवण्‍याचा न‍िर्णय कंपनीने घेतला आहे. यात आरकॉमच्या कॉल सेंटर ऑपरेशन्स तसेच शेअर्ड सर्व्हिसेस टीमचे कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे आउटसोर्सिंग डील निश्चित झाल्यानंतर  सहा हजार कर्मचार्‍यांना दोन्ही थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये पाठवले जाणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. बीपीओ आणि शेअर्ड सर्व्हिस बिझनेसमधून कंपनीला अपेक्षीत नफा होत नसून त्यामुळे त्याला कंपनीन आउटसोर्स करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तसेच

बीपीओ आणि शेअर्ड सर्विसेसला आउटसोर्स केल्याने कंपनीला सुमारे 200 कोटी   रूपयांचा नफा होईल.