शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (13:20 IST)

रेल्वे अर्थसंकल्प Live

3
रेल्वे बजेट 2015 सादर
कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा न करताच प्रभूंनी भाषणाचा समारोप केला.
एक भारत श्रेष्ठ भारतासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत - सुरेश प्रभू
स्वयंरोजगार आणि मनुष्यबळ विकासावर भर देणार, कोकण रेल्वेवर गेल्या तीन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जात आहे - सुरेश प्रभू
रेल्वे गाड्यांना व स्टेशनला कंपन्यांची नावे देऊन पैसे कमवणार - सुरेश प्रभू
यावर्षाअखेरपर्यंत देशाच्या किनारपट्टीवरील भागांना रेल्वेशी जोडण्यासाठी कोस्टल कनेक्टिव्हीटी प्रॉग्रेम सुरु करणार - सुरेश प्रभू
कामगिरीवर आधारित बोनस देण्याची पद्धत देणार, आरपीएफसाठी विद्यापीठ स्थापन करणार - सुरेश प्रभू
रेल्वेत सौर उर्जेचा वापर करणार - सुरेश प्रभू
रेल्वेच्या विकासासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप राबवणार - सुरेश प्रभू
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत नवीन रेल्वे मार्ग बांधण्यासाठी संयुक्त योजना राबवणार - सुरेश प्रभू
मुंबईत लवकरच एसी ट्रेन धावणार - सुरेश प्रभू
निवडक स्थानकांवर पिक अपची सुविधा - सुरेश प्रभू
कायाकल्प योजनेद्वारे भारतीय रेल्वेतील तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करणार - सुरेश प्रभू
देशातल्या ४ विद्यापीठांमध्ये रेल्वेचे संशोधन केंद्र - सुरेश प्रभू
ट्रेनची टक्कर टाळण्यासाठीही अलार्म सिस्टम - सुरेश प्रभू
वाराणसीमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या नावाने रेल्वेचे संशोधन केंद्र स्थापन करणार - सुरेश प्रभू
रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी जूनपर्यंत अॅक्शन प्लॅन मांडणार, मानव विरहित फाटकांवर अलार्म बसवणार - सुरेश प्रभू
१०८ गाड्यांमध्ये ई कॅटरिंगची सुविधा देणार - सुरेश प्रभू
रेल्वे मार्गांवरील लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यास प्राधान्य, देशभरात १९०० हून अधिक आरओबी बांधणार, यासाठी ६ हजार कोटींचा निधी - सुरेश प्रभू
मुंबई - दिल्लीसोबतच अन्य नऊ मार्गांवर हायस्पीड ट्रेन धावणार - सुरेश प्रभू
प्रवाशांसाठी २४ तास सुरु असलेली १८२ ही हेल्पलाईन सुरु करणार - सुरेश प्रभू
लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी देणार - सुरेश प्रभू
प्रवाशांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यंदा ६७ टक्के अतिरिक्त निधी देणार - सुरेश प्रभू
४०० रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देणार - सुरेश प्रभू
पूर्वोत्तर आणि जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्यास प्राधान्य - सुरेश प्रभू
रेल्वेतील स्वच्छतेसाठी नवीन स्वच्छता विभाग - सुरेश प्रभू
मोठ्या शहरांमधील १० रेल्वे स्थानकांवर सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल करणार - सुरेश प्रभू
वाशांना दोन महिन्यांऐवजी ४ महिन्यांअगोदरच आरक्षण करता येणार - सुरेश प्रभू
यावर्षी १७ हजार स्वच्छता गृहांचे बायो टॉयलेटमध्ये पुनर्विकास करणार - सुरेश प्रभू
ऑपरेशन ५ मिनीट राबवणार, यामुळे अनारक्षित तिकीटावर प्रवास करणा-या प्रवाशांना पाच मिनीटांत तिकीट देण्याचे लक्ष्य - सुरेश प्रभू
खासदारांनी त्यांच्या निधीचा जास्तीत जास्त वापर रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करावे - सुरेश प्रभूंचे आवाहन
120 दिवस अगोदर होतील तिकिट बुकिंग 
मुंबईत एसी ट्रेन सुरू करणार 
खासदारांनी त्यांच्या निधीचा जास्तीत जास्त वापर रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करावे - सुरेश प्रभूंचे आवाहन
सर्वसामान्यांसाठी ठराविक गाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या वाढवणार - सुरेश प्रभू
रेल्वेतून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन व्हिलचेअर बुक करण्याची सुविधा देणार - सुरेश प्रभू
प्रवाशांना गाड्यांचे आगमन व डिपार्चरच्या वेळेसंबंधीची एसएमसद्वारे देणार - सुरेश प्रभू
रेल्वेत खासगी कंपन्यांकडून गुंतवणूक होणार, रेल्वेचे जाळे देशभरात पोहोचवणार - सुरेश प्रभू
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही लांब पल्ल्यांच्या गाड्या व उपनगरीय गाड्यांच्या महिल्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार - सुरेश प्रभू
हिंदी व इंग्रजी भाषेशिवाय अन्य भाषेतही ई तिकीट देणार - सुरेश प्रभू
विमानाप्रमाणेच रेल्वेतही व्हॅक्यूम टॉयलेट तयार करणार - सुरेश प्रभू
निर्भया फंडमधील निधीचा वापर रेल्वेतून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी करणार - सुरेश प्रभू
प्रवाशांना चांगली सुविधा आणि स्वच्छतेवर भर देणार - सुरेश प्रभू
रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न - सुरेश प्रभू
रेल्वेच्या प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नाही - सुरेश प्रभूंचा प्रवाशांना दिलासा
स्टेशन्सवर वॉटर व्हेडिंग मशिन्स आणणार - प्रभू 
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही 
रेल्वे अॅपही तयार करणार 
रेल्वे स्वच्छता जागृती अभियान राबवणार 
5 मिनिटांत मिळणार तिकिट तासंतास थांबावे लागणार नाही 
रेल्वे भाड्यात वाढ करणार नाही - प्रभू 
२० हजार सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश केला गेला आहे - सुरेश प्रभू
एका रात्रीत रेल्वेची स्थिती बदलणार नाही - सुरेश प्रभू
रेल्वेत पार्टनरशिपची गरज, राज्य सरकारांसमवेत मिळून काम करण्याची गरज - सुरेश प्रभू
सुरक्षित आणि पायाभूत सुविधा पुरवणे हेच आमचे लक्ष्य - सुरेश प्रभू
भावी पिढीसाठी गुंतवणूक वाढवणे गरजेचे - सुरेश प्रभू
रेल्वे मंत्रालयावर जनतेच्या अपेक्षांचे ओझे आहे, त्यांना चांगल्या सेवेची अपेक्षा - सुरेश प्रभू
काही तरी नवीन जोडावे लागेल, जुने तोडावे लागेल, सामर्थ्य दाखवावे लागेल - सुरेश प्रभू
आगामी पाच वर्षांत रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार, यामध्ये कमी खर्च, यामध्ये भूसंपादनाची समस्या नाही, वेग वाढवल्यास वेळेतही बचत - सुरेश प्रभू
गेल्या काही वर्षांत रेल्वेकडे दुर्लक्ष झाले - सुरेश प्रभू
रेल्वे ही पंतप्रधानांची प्राथमिकता - सुरेश प्रभू
लोकसभेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या भाषणाला सुरुवात, प्रभूंच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष.
मोदी सरकारचं दुसरं रेल्वे बजेट 
सुरेश प्रभूंच पहिलंच रेल्वे बजेट 
प्रभूंची कृपा कोणावर? 

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू संसदेत पोहोचले, प्रभूंसोबत रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हाही उपस्थित.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू संसदेकडे रवाना, थोड्याच वेळात प्रभू संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार.
 
मोदी सरकारच्या कालावधीतील पहिला अर्थसंकल्प आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू  संसदेत सादर करणार आहेत. ‘अच्छे दिन’च्या प्रतिक्षेत असणार्‍या रेल्वेप्रवाशांना ‘प्रभू’ पावणार का? ते लवकरच स्पष्ट होणार आहे.