शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

श्रीमंत देशांच्या यादीत भारत सातवा

नवी दिल्ली- वाटतंय 'अच्छे दिन'चे स्वप्न सत्यात उतरत आहे. कारण जगाच्या सर्वात श्रीमंत 10 देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश करण्यात आला आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इटलीला मागे सोडत भारताने टॉप टेन श्रीमंत देशाच्या यादीत सातवा स्थान पटकावला आहे. अहवालानुसार भारताची संपत्ती 5600 अब्ज डॉलर्स एवढी अनुमानित करण्यात आली आहे.
 
भारतानंतर कॅनडा (4700 अब्ज डॉलर्स), ऑस्ट्रेलिया (4500 अब्ज डॉलर्स) आणि इटली (4400 अब्ज डॉलर्स) यांना स्थान मिळाले. 
 
न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. 48900 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, तर चीन 17400 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या आणि जपान 15100 अब्ज डॉलर्सच्या मदतीने तिसर्‍या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर ब्रिटन 9200 अब्ज डॉलर्स, पाचव्या स्थानी जर्मनी 9100 अब्ज डॉलर्स आणि सहाव्या स्थानी असणार्‍या फ्रान्सची 6600 अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती अनुमानित करण्यात आली.
 
अहवालानुसार ऑस्ट्रेलिया आणि भारत देखील मजबुतीने पुढे आले आहेत. मागील 12 महिन्यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने इटलीला मागे टाकले.