बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 24 जून 2016 (11:15 IST)

सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी गडगडला

मुंबई शेअर बाजाराच्या प्री ओपनिंग सेशनला, सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी  गडगडला. ब्रिटनमध्ये होत असलेल्या जनमत चाचणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे.

ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथल्या नागरिंकांनी काल मतदान केलं आहे. या जनमत चाचणीचा निकाल  आज आहे. हा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो.

बाजार उघडताच त्यामध्ये किंचित सुधारणा होऊन, 730 च्या आसपास घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स काल 27002 अंकांवर बंद झाला होता, आज उघडताच तो 26367 अंकांवर जाऊन पोहोचला. दुसरीकडे पौंडनेही 31 वर्षातील निच्चांक गाठला, डॉलरच्या तुलनेत 9 टक्क्यांनी घसरला.