शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (15:01 IST)

सोनूचं गाणं हवाईसुंदरींना पडलं महागात

नवी दिल्ली- पार्श्वगायक सोनू निगम ने विमानात प्रवास करताना सहप्रवाशांच्या विनंतीला मान देऊन गाणे म्हणणे 5 हवाईसुंदरींना महागात पडले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिले आहेत. 
 
सोनू निगमने प्रवाशांना सूचना देण्यासाठी असलेल्या अनाउन्समेंट सिस्टिममधून गाणे गावून प्रवाशांना सरप्राइज दिले. बघता-बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि याचा गांर्भीय पाहत कंपनीने हवाईसुंदरींना निलंबित केले.
 
जोधपूरहून मुंबई येत असलेल्या जेट एअरवेजच्या विमानातून 4 जानेवारीला प्रवास करत असताना सोनू निगमला सहप्रवाशांनी गाण्याची विनंती केली. तेव्हा सोनूने अनाउन्समेंट सिस्टिमचा वापर करून ‘वीरझरा‘ चित्रपटातील ‘दो पल रूका‘ आणि ‘रिफ्युजी‘मधील "पंछी नदीयॉं पवन के झोके‘ ही दोन गाणी गायली. प्रवाशांनीही त्याला भरपूर प्रतिसाद दिला. 
 

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर या घटनेची नागरी उड्डाण महासंचालनालयाने गंभीर दखल घेतली. विमानातील अनाउन्समेंट सिस्टिमचा ताबा घेण्यास हवाईसुंदरींनी प्रवाशांना परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला.