शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 16 फेब्रुवारी 2016 (15:48 IST)

सोन्याच्या दरात घट

शेअर बाजार स्थिरावला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.कालपर्यंत 29 हजार 224 रुपयांवर असलेलं सोनं आज मात्र 28 हजार 706 रुपयांवर पोहोचलं आहे. तर चांदीमध्येही 1 हजार 26 रुपयांची घट झाली आहे.

सध्या बजारात चांदीचा प्रतिकिलो दर 36 हजार 958 रुपये आहे. येत्या काळात शेअर बाजारात वाढ झाली तर सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले होते. आता मात्र शेअर बाजार स्थिरावला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.