गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: जमशेदपूर , मंगळवार, 29 डिसेंबर 2009 (13:38 IST)

स्टेट बँक 12 हजार जणांची भरती करणार

WD
WD
भारतीय स्टेट बँकेने आगामी काळात 12 हजार जणांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षात बँकेने 30 हजारांवर भरती केली होती. मंदीच्या काळातही भरती करणारी बँक ही एकमेव बँक ठरली असून, आगामी काळातही अशाच प्रकारची भरती करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष ओ पी भट्ट यांनी म्हटले आहे.

बँकेवर मंदीचा कोणताही प्रभाव नव्हता आणि या पुढील काळातही हा जाणवणार नसल्याचे ते म्हणाले. बँकेकडे अनेक बँकांनी अधिग्रहण संदर्भातील प्रस्ताव पाठवले होते, परंतु देश हिताचा विचार करता बँकेने त्यांना नकार दिल्याचे भट्ट म्हणाले.