शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By वेबदुनिया|

ख्रिसमस स्पेशल : ऑरेंज फ्रॉस्टिंग केक

साहित्य - 300 ग्रॅम आयसिंग शुगर, सव्वा कप डबल क्रीम, 1 कप कॅस्टर शुगर, 2 मोठे चमचे क्रीम, कप मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 कप कोको पावडर, 1 मोठा चमचा लोणी (वितळलेलं), 1 चमचा संत्र्याचे इसेंस, 2 मोठे चमचे संत्र्याचा रस, 2 मोठे चमचे चॉकलेटचे पातळ काप.

कृती - सर्वप्रथम क्रीम आणि साखर मिसळावे. नंतर त्या मिश्रणाला चांगले फेटून घ्यावे. मैदा, बेकिंग पावडर व अर्धा कप कोको पावडर चाळून क्रीमच्या मिश्रणात घालावे आणि मैद्याला चांगले फेटावे. नंतर तूप लागलेल्या केक पॉटमध्ये सेट करून 180 डिग्री सेंटीग्रॅड वर 45-50 मिनिट बेक करावे.

बेक्ड केकला 10 मिनिट ओव्हनमध्ये ठेवावे. नंतर त्याला थंड होऊ द्या. आयसिंग शुगर आणि अर्धा कप कोकोला एका कपात चाळून घ्या व त्यात लोणी-इसेंस आणि संत्र्याचा रस मिसळावा. केकला सर्विंग प्लेटमध्ये ठेवावे. पूर्ण केकवर आयसिंग शुगर पसरावे. वरून चॉकलेटचे चपटे तुकडे सजवून सर्व्ह करावे.