शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By वेबदुनिया|

ख्रिसमस स्पेशल : फ्रूटी राईस केक

साहित्य - सव्वा कप बासमती तांदूळ, 4 कप दूध,1/2 कप कॅस्टर शुगर,1/2 वेलची पूड, 2 तेजपान, 6 चमचे क्रीम.

डेकोरेशनसाठी - सव्वा कप डबल क्रीम, व्हॅनिला इसेंस, 1 लिंबाचे सालपट (किस केलेला), 3 मोठे चमचे कॅस्टर शुगर, 1/2 कप स्ट्रॉबेरीचे तुकडे,1 मोठा चमचा चेरी.

कृती - सर्वप्रथम तांदूळ 1/2 तास भिजत घालावे. नंतर एका पॅनमध्ये टाकावे. त्यात पॅनमध्ये दूध, साखर वेलची पूड आणि तेजपान घालून गॅसवर ठेवावे. उकळी आल्यावर आच मंद करून 20 मिनिट शिजवावे. तांदुळाला थंड करावे. त्यात क्रीम फेटून घालावी. आता तांदळाच्या मिश्रणाला केक पॉटमध्ये टाकावे आणि 40-45 मिनिट 180 डिग्री सेंटीग्रॅडवर बेक करावे. बेक्ड केकला 8-10 तास पॉटमध्येच ठेवावे. डबल क्रीमला फेटून त्यात इसेंस, लिंबाचे सालपट आणि साखर मिसळावे व केकवर ते पसरवावे. वरून स्ट्रॉबेरी आणि चेरीने सजवून सर्व्ह करावे.