शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By वेबदुनिया|

ख्रिसमस स्पेशल : रम केक

साहित्या : काजू 100 ग्रॅम, 50 ग्रॅम मनुका, 100 ग्रॅम गुलाब कतरी, 50 ग्रॅम ऑरेंज पील, 50 ग्रॅम चिरोंजी, 50 ग्रॅम खजूर, 50 ग्रॅम स्वीट जिंजर, 50 ग्रॅम काळ्या मनुका, 1/4 कप रम.
 
केकसाठी साहित्य : 250 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम मैदा आणि 6 अंडी. 
 
कृती : सर्वप्रथम केक तयार करण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व प्रकारच्या मेव्यांना बारीक कापून आवश्यकतेनुसार रममध्ये भिजत घालावे. एक मोठ्या भांड्यात अंडी फोडून त्यांना चांगल्याप्रकारे फेटून घ्या. आता त्यात साखर व मैदा घालून मिश्रणाला एकजीव करावे. नंतर त्यात रममध्ये भिजलेले सुके मेवा व 1/4 कप रम मिसळावी. मिश्रणाला परत एकजीव करावे. तयार मिश्रणाला तूप लावलेल्या केक पॉटमध्ये ओतावे. पॉटला गरम ओव्हनमध्ये 160 डिग्रीवर ठेवावे. 40-45 मिनिटापर्यंत केक बेक करावी व थंड झाल्यावर सावधगिरीने काढून घ्यावी. स्वादिष्ट रम तयार आहे.