testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ख्रिसमससाठी सजली जगभरातील शहरे

Last Modified बुधवार, 24 डिसेंबर 2014 (16:52 IST)
डिसेंबर महिन्यात ख्रिस्ती बांधव ख्रिसमस सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. ख्रिसमसचे स्वागत करण्यासाठी ते आपल्या घरांची
साफसफाई, घरांना सजवणे, नवनवीन कपड्यांची खरेदी करणे अशी कामे करताना दिसतात. सध्या बाजारात आपल्याला दुकानांमध्ये
वेगवेगळ्या स्वादांचे केक दिसतात. यामध्ये सध्या चॉकलेट केकला जास्त मागणी आहे. काही ख्रिस्ती बांधव केक घरीच बनवतात. आपण
दिवाळीत जसा करंजी, चकल्यांचा फराळ बनवतो त्याचप्रमाणे ख्रिस्ती बांधवसुद्धा नाताळमध्ये बिस्किटे, केक असे खाण्यांचे पदार्थ बनवतात.

ख्रिसमस आता एका आठवड्यानंतर लगेचच असल्याने ख्रिस्ती बांधवांनी बाजारात गर्दी करायला सुरुवात केली आहे. बाजारात केकच्या
दुकानाबाहेर आता सांताचे स्टॅच्यूही उभारलेले दिसू लागले आहेत. सर्व ख्रिस्ती बांधव ख्रिसमस ट्रीसुद्धा खरेदी करताना दिसत आहेत.

आपापल्या घरामध्ये त्या ट्रीला आणून, त्या ट्रीवर तर सजावट करतातच मात्र त्या ट्रीच्या अवतीभोवती येशूची लहान घरासारखी झोपडीहीबनवतात. हे दृश्य बघायला खूप छान वाटते. ख्रिसमसला सर्व ख्रिस्ती बांधव प्रत्येकाच्या घरात मिठाई, केकची देवाणघेवाण करतात. तसेच
प्रत्येक ठिकाणी चर्चमध्ये आठवड्यापूर्वी वेगवेगळ्या स्पर्धाचे किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. बायबल, रंगबेरंगी
स्टाल्स, बॉल्स, आर्टिफिशीयल डेकोरेशन ख्रिसमस ट्री आदी गोष्टींना बाजारात जास्त प्रमाणात मागणी आहे. या सर्व गोष्टी १00 रुपयांच्यापुढेच उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये न्यू इयरच्या पार्टीसाठीही लोकांची शॉपिंग होताना दिसत आहे. या दिवसात पांढर्‍या रंगाच्या पोशाखास
जास्त महत्त्व असते त्यामुळे त्यांच्या किमतीतही वाढ झालेली दिसत आहे.


यावर अधिक वाचा :

या सात संकेतांनी कळतं की पितर खूश आहे

national news
शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त ...

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

राशिभविष्य