गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By

ख्रिसमस कार्डची सुरुवात 172 वर्षांपूर्वी

डिसेंबर महिना म्हणजे ख्रिश्चन बांधवांसाठी अत्यंत पवित्र महिना. भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिन म्हणून ख्रिसमस साजरा करतात. हा पवित्र सण अनेक शतकांपासून साजरा केला जातो. या सणारच्या निमित्ताने शुभेच्छा पत्रे अथवा ग्रिटिंग कार्ड पाठवली जातात, पण यास खर्‍या अर्थाने कधीपासून सुरुवात झाली, हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरेल. 
 
तसे पाहिल्यास सर्वप्रथम ख्रिसमस कार्ड 1842 मध्ये विल्यम एंगले यांनी पाठवले होते. ज्यावेळी त्यांनी हे कार्ड पाठवले त्यावेळी ख्रिसमस सण साजरा करण्यात येत होता, त्यामुळे हे कार्ड जगातील पहिले ख्रिसमस कार्ड ठरले. असेही सांगण्यात येते की, विल्यम एंगले यांनी ठावलेल्या या कार्डवर शाही परिवारचे छायाचित्र होते. यावर 'विल्यम एंगले यांच्या मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा' असे लिहिण्यात आले होते. 
 
172 वर्षांपूर्वी ही बाब अत्यंत नवी होती, यामुळे हे कार्ड महाराणी व्हिक्टोरिया यांना दाखवण्यात आले होते. यावर खूश होऊन महाराणीने आपला चित्रकार डोबसन याला बोलावून शाही ख्रिसमस कार्ड तयार करण्यास सांगितले. तेव्हापासून ख्रिसमस कार्डला सुरुवात झाली.