बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2015 (15:26 IST)

'मँगो डॉली'ला पाहून प्रेक्षक म्हणतील वाह 'गुरु'

गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री अशी विशेषणं ऐकली की उर्मिला कानिटकर- कोठारे हिचं नाव चटकन तोंडी आल्या शिवाय रहात नाही. दुनियादारी सिनेमात साकारलेली मिनू काहीशी तशीच होती. मात्र प्यारवाली लव्ह स्टोरीने तिच्या चाहत्यांना जोरदार झटकाच दिला. तुफान, टॉमबॉईश नंदिनीने प्रेक्षकांची झोपचं उडवली. आता तर उर्मिला आपल्याला भन्नाट रुपात दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल निर्मिती असलेला 'गुरु' सिनेमा २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधव करत असून या चित्रपटात उर्मिलाचा नुसताच वेगळा रोल नाहीये तर तिचा हटके मेक ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

अंकुश चौधरीच्या 'सनग्लासेस' च्या स्टाईलची जशी सगळीकडे चर्चा आहे तशीच उर्मिला तिच्या जबरदस्त लुकमुळे रॉकऑन झालीये. तिने 'गुरु' सिनेमात साकारलेली 'मँगो डॉली' तिच्या चाहत्यांनी यापूर्वी नक्कीच पहिली नसेल. 'गुरु' मधील तिचा रावडी लुक तिने आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी चाकोरी बाहेरचा असेल यात शंका नाही. तिच्या तोंडी असलेले गावरान संवाद, भडक रंगाच्या घागरा चोळीचा पेहराव आणि एकंदरच तिने वठवलेली भूमिका पाहून वाह 'गुरु' म्हणतच प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडतील. म्हणण्याची मध्ये तिची चौकटीच्या बाहेर भूमिका असणार आहे.