गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (16:56 IST)

संघर्ष यात्रा चित्रपटात श्रुती मराठे

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील ‘संघर्ष यात्रा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात लय भारी सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा शरद केळकर हा गोपीनाथ मुंडे साकारणार आहे. तर या सिनेमातील आणखी एक प्रमुख भूमिका म्हणजे, महिला कल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे. ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेत्री श्रुती मराठे साकारणार आहे. या सिनेमाचं नावदेखील पंकजा मुंडे यांनी नुकत्याच केलेल्या राजकीय कॅम्पेनचंच देण्यात आलं आहे. या सिनेमाविषयी एबीपी माझाशी बोलताना श्रुती म्हणाली की, ही भूमिका साकारणं तसं फार कठीण होतं. कारण की, या आधी मी पंकजाताईंना केवळ एकदाच भेटले होते. मात्र, या भूमिकेत जान आणण्यासाठी मी त्यांच्या सभांचे आणि दौर्‍यांचे अनेक व्हिडिओ पाहिले. त्यामुळे पंकजा मुंडे साकारताना मला याचा बराच फायदा झाला.