शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 10 डिसेंबर 2015 (10:33 IST)

‘सवाई’चा आजपासून ‘स्वरयज्ञ’

६३व्या सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. आर्यसंगीत प्रसारक मंडळ आयोजित महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. १०) सुरुवात पुण्याच्या नम्रता गायकवाड हिच्या सनईवादनाने होणार आहे.
 
त्यानंतर गायक पं. भास्करबुवा बखले यांच्या परंपरेतील सावनी कुलकर्णी आणि शिल्पा पुणतांबेकर यांचे सहगायन रसिकांना ऐकता येणार आहे. किराणा घराण्याचे पं. विश्वनाथ यांचे गायन तसेच मल्हार कुलकर्णी यांचे शिष्य रूपक कुलकर्णी व प्रवीण शेवलीकर यांच्या बासरी व व्हायोलिन सहवादनानंतर ख्यातनाम गायक पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनाने उत्तराधार्ची सांगता होईल. पतियाला घराण्याच्या गायिका सुचिस्मिता दास या युवा कलाकाराच्या गायनाने दुसºया दिवसाचा (दि. ११) प्रारंभ होईल. प्रसिद्ध गायक पं. राजन-साजन मिश्रा, पं. जसराज, पं. उल्हास कशाळकर, मालिनी राजूरकर यासारख्या संगीतातील दिग्गज शिरोमणींसह सावनी कुलकर्णी, शिल्पा पुणतांबेकर, सुचिस्मिता दास, अमजद अली, भारती प्रताप या नव्या पिढीतील सात कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या महोत्सवात रसिकांना अनुभवायला मिळेल.