testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सरकारला ईश्वरानेच सद्बुद्धी द्यावी -ओम पुरी

ompuri
Last Updated: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (11:43 IST)
लोकहितासाठी काम करताना अगर लोकांसाठी कोणतेही कायदे करताना सरकारने लोकांची मते विचारात घेवून काम केले पाहिजे अशी अपेक्षा प्रसिध्द अभिनेता ओम पुरी यांनी येथे व्यक्त केली.
'सलाम पुणे'पुरस्काराने ओम पुरी आणि एक अलबेला या चित्रपटाला डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी साहित्यिक संजय सोनवणी, प्रा. फुलचंद चाटे, सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर एक अलबेला चे मोनीश बाबरे, शेखर सरतांडेल अभिनेत्री राधा सागर, डॉ दत्ता कोहिनकर, निकिता मोघे, मोहनकुमार भंडारी, अॅड.दिलीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुरी म्हणाले, 'वाहतुकीचे नियमन करण्यासाठी लोकांना सुधारण्यासाठी शासनाने दंडाच्या रकमेत मोठ्ठी वाढ केली आहे, अन्य पगारवाढीचे हि कायदे केले आहेत. पण कायदे करताना जर ते लोकहितासाठी केले जातात तर लोकांचा त्यावर सल्ला घेणे हि गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वर अवाच्या सवादंड लावून सरकारची तिजोरी भरणार आहे काय ? कि पोलिसांची मुले अमेरिकेत शिकायला जाणार आहेत? असा हि सवाल त्यांनी केला आणि असे काही नियम कायदे करताना ... सरकारला ईश्वरानेच सद्बुद्धी द्यावी असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. मराठी चित्रपट सृष्टीतील निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू या दिग्गजांच्या आठवणी यावेळी त्यांनी सांगितल्या.

राजकीय नेते, अभिनेते, सामाजिक नेते या सर्वांच्या इमारती गरीबांच्या दुख्खावरच उभ्या राहत असतात .खरे तर या सर्वांची जातकुळी एकच... पण दिवसेंदिवस सर्वांचे कर्तुत्व वाढले पाहिजे आणि गरीबांच्या अपेष्टा कमी होत गेल्या पाहिजेत अशी अपेक्षा यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली.
हर्षा शहा, संगीतकार हर्षित अभिराज, अभिनेता मयूर लोणकर, बबलू राजपाल, वैभव पगारे, प्रशांत बोगम आदींचा यावेळी ओमपुरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार श्रीराम शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रास्तविक विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी केले तर आभार योगेश वणवे यांनी मानले.


यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...