गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2017 (17:06 IST)

‘एडल्ट्स ओन्ली’चे चित्रीकरण ‘आयफोन ६’ वर

‘येडयांची जत्रा’, ‘फोर इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडे याचा ‘एडल्ट्स ओन्ली’ हा चित्रपटही त्यातील वेगळे पणामुळे चर्चेत आला आहे. विषयाचे गांभीर्य ओळखून मिलिंदने ‘एडल्ट्स ओन्ली’ हा चित्रपट ‘आयफोन ६’ वर चित्रीत करण्याची योजना आखली. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टरदेखील हटके आहे. मिलिंद कवडेने त्याच्या फेसबुक अकाउन्टवरून चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.