शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2016 (12:38 IST)

येत्या २२ तारखेपासून अंकुर फिल्म फेस्टिव्हल राष्ट्रीय पारितोषिक विजेते कमल स्वरूप यांची हजेरी

अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंट आणि मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व्या ‘अंकुर फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येत आहे. हा फेस्टीव्हल येत्या २२ ते २५ डिसेंबर या काळात रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूररोड, नाशिक येथे संपन्न होत आहे. यंदाही फेस्टीवला दिग्गज मान्यवरांची हजेरी लाभली आहे. यात राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते फिल्म, टेलिव्हिजन आणि रेडिओ संचालक, पटकथालेखक कमल स्वरूप आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फिल्ममेकर स्त्रीवादी दीपा धनराज यांची उपस्थिती लाभणार आहे. सोबतच फिल्म मेकर्ससाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा सुद्धा मान्यवरांच्या उपस्थिती घेतल्या जाणार आहेत.  
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळ्या आणि आशय संपन्न फिल्म यांचा खजिना घेऊन अंकुर फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा फेस्टीवलमध्ये ८५ फिल्म दाखविल्या जाणार आहेत. या फिल्मस मध्यप्रदेश, गोवा, गुजरातसह नाशिक, कोल्हापूर, मुंबई, सांगली, रायगड उस्मनाबाद, जळगाव, पुणे, बुलढाणा या ठिकाणाहून आल्या आहेत. फेस्टीवला दिनांक २२ डिसेंबर २०१६ रोजी संध्याकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते फिल्म, टेलिव्हिजन आणि रेडिओ संचालक, पटकथालेखक कमल स्वरूप यांच्या हस्ते फेस्टीवलची सुरुवात करण्यात येणार आहे. सोबतच त्यांनी लिहिलेली ट्रेसिंग फाळके (Tracing Phalke) ही फिल्म दाखविली जाणार आहे. तर समारोप दिनांक २५ डिसेंबर २०१६ रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे पुरस्कार विजेत्या फिल्ममेकर स्त्रीवादी दीपा धनराज यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी त्यांनी बनविलेल्या इनवोकिंग जस्टीस (Invoking Justice) ही फिल्म दाखवली जाणार आहे.
 
फिल्म मेकर्ससाठी कार्यशाळा
गेल्या अंकुर फिल्म फेस्टीवलमध्ये अनेक फिल्ममेकर्स यांनी फिल्म बनविण्याचे मार्गदशन करण्यासाठी अंकुरने मदत करावी असे सुचविले होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन यंदा फेस्टीवलमध्ये दोन सत्रात दोन वेगवेगळ्या विषयावर मान्यवरांच्या मार्गदर्शानाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिली कार्यशाळा अनिल झनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. ही कार्यशाळा लघु चित्रपट बनवण्याच्या पध्दती (Approaches to Short film making) याविषयावर होणार आहे. तर दुसरी कार्यशाळा पटकथा लेखन (Screen writing) याविषयावर मिताली जोशी यांची दुपारी २ ते ४ या वेळेत होणार आहे. सदरच्या दोन्ही कार्यशाळांमध्ये कोणीही उपस्थिती लावू शकणार आहे. मात्र कार्यशाळेत होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी फिल्ममेकिंगचा अभ्यास अथवा अनुभव आवश्यक असणार आहे. तरी फेस्टीवल पाहण्यासाठी नाशिककरांनी आवर्जून यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
मान्यवरांची ओळख
कमल स्वरूप : राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते फिल्म, टेलिव्हिजन आणि रेडिओ संचालक, पटकथालेखक. Rangbhoomi (2013), Bandish (2007), When the Image Meets the Shadow (2004), Om-Dar-Ba-Dar (1988), Ghashiram Kotwal (1976), Dorothy (1974) आदी फिल्मसचे दिग्दर्शक केले आहे. तर Tracing Phalke (2013), Private Detective: Two Plus Two Plus One (1997) (dialogs), Salim Langde Pe Mat Ro (1989) (researcher) (script consultant), Salaam Bombay (dialogs)साठी लेखन लेखन केले आहे. Gandhi (1982) या गाजलेल्या फिल्म साठी सहाय्यक दिग्दर्शक.   
दीपा धनराज : स्त्रीवादी पुरस्कार विजेत्या दिग्दर्शका, महिला चळवळीमध्ये सक्रीय सहभाग, महिला स्थिती संबंधित विविध विषयांवर कार्यशाळा, सेमिनार व चर्चा गट सहभाग, महिलांच्या विविध प्रश्नांचा मोठा अभ्यास, शिक्षण व आरोग्य याविषयावर अनेक माहितीपटांची निर्मिती केली असून आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवली आहेत. यात  Enough of this Silence (2008) , The Advocate' (2007), "Nari Adalat" (2000), 'Itta Hejje Mundakka Thegiya Bediri Hindakka', a series of 12 films for elected women in Gram Panchayats (1995), 'The Legacy of Malthus' (1994), 'Something like a War' (1991), 'Kya Hua Iss Shehar Ko' (1986) आणि 'Sudesha'(1983) या फिल्मसचा समावेश आहे.असंख्य चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने जगभरात प्रवास केला आहे.
 
अनिल झनकर : भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया माजी सहाय्य्क प्राध्यापक, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत उभारलेल्या अर्थसहाय्यित मानवी विकास प्रकल्पासाठी माजी समन्वयक.  
 
मिताली जोशी : नाटकशास्त्राचे शास्त्रोक्त शिक्षण, मराठीतील चित्रपट, नाटक आणि मालिकांसाठी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यात हरीश्चंद्राची फॅक्टरीसाठी सहाय्यक दिग्दर्शन, तुज माज जमेना, बे दुणे दहा या मालिकांसाठी लेखन, कनुप्रिया या नाटकासाठी दिग्दर्शन. याशिवाय पंडीत सत्यदेव दुबे, गोविंद नहलानी आदी दिग्गजांसोबत कामांचा अनुभव. सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून फेलोशिप.