testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुबोध-श्रुतीचे 'शुभ लग्न सावधान'

shubh lagna savdhan
Last Modified गुरूवार, 7 जून 2018 (11:06 IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे, पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित 'शुभ लग्न सावधान' या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच पोस्टर लाँच करण्यात आले. 'शुभ लग्न सावधान' असे या सिनेमाचे शीर्षक लक्षात घेता, हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित असल्याचा अंदाज येतो. दुबईत चित्रीकरण करण्यात आलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध आणि श्रुती झळकत असून, या दोघांची सुंदर प्रेमकहाणी यात दाखवली जाणार असल्याची जाणीवदेखील होते.

पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेला हा कौटुंबिक सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांना यात आशयघन मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर एकत्र येत असलेल्या सुबोध-श्रुतीच्या चाहत्यांसाठी 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा खूप खास ठरणार आहे, हे निश्चित !


यावर अधिक वाचा :

'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

national news
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...

'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला !

national news
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ ...

'धूम4'चा शाहरुख खलनायक

national news
प्रेक्षकांनी यशराज फिल्म्सनिर्मित 'धूम 4'च्या गेल्या तिन्ही भागांना भरभरून प्रतिसाद दिला. ...

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

national news
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल जाणार्‍या ...

काळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर

national news
सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म ...