Widgets Magazine
Widgets Magazine

...म्हणून खास आहे ‘चि. व. चि. सौं. का.’ चं शीर्षक गीत

Chi Va Chi Sau Ka
झी. स्टुडियोज प्रस्तुत आणि निखिल साने निर्मित ‘चि. व. चि. सौं. का.’ या चित्रपटाच्या ट्रेलरला तर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला पण हल्ली या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आले आहे.
“एक आहे चिरंजीव, एक आहे चि. सौं. का., श्री आणि सौ.च्या आधी, चि. व. चि. सौं. का...” असे गीताचे बोल आहे. पण यात एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे या गीतामध्ये कोणतेही वाद्य वापरण्यात आलेले नाही. यात वाद्यांचे आवाज तोंडाने काढलेले स्वर आहे. हे गाणं स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. आणि वाद्यांचा प्रयोग न करता तोंडातून वाद्यांचे आवाज काढणे हेच या गाण्याची विशेषता आहे.
Widgets Magazine
नरेंद्र भिडे यांनी या गीताला संगीत दिले असून परेश मोकाशी यांचे बोल आहे. गाण्याच्या चित्रीकरणात मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, पूर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष दिसून येत आहे.

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी ही कथा आणि संवाद लिहिले असून दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. ‘चि. व चि. सौ. कां.’ हा सिनेमा 19 मे 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. >
"चिरंजीव' चा होतो "श्री" नी "चि. सौ. कां." चे होते "सौ"
कसे घडते हे ट्रान्सफॉरमेशन चला टायटल सॉंग मधे पाहू...!!
>

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :