बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

डॉ. निलेश साबळे काही आठवडे विश्रांती घेणार

गेल्या तीन वर्षांपासून निलेश आपल्या सहकार्‍यांसोबत दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची रंगतदार मेजवानी घेऊन येतो. मात्र आता डॉ. निलेश साबळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही आठवडे विश्रांती घेणार आहे. 
 
शो मस्ट गो ऑन हा आपल्या मनोरंजन इंडस्ट्रीचा आणि कलाकारांचा धर्म. याचमुळे निलेशच्या अनुपस्थितीतही हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. यासाठी हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव या कार्यक्रमाच्या निवेदनाची सूत्रे सांभाळणार आहे. मागच्या काही दिवसांपासून निलेशला प्रकृती अस्वस्थ्याचा त्रास जाणवत होता. यामुळेच निलेशने वैद्यकीय सल्यानुसार काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही विश्रांती थोड्याच दिवसांची असून लवकरच तो या कार्यक्रमात पुन्हा हजेरी लावेल.