testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ड्राय डे चित्रपट कास्ट आणि क्र्यू

dry day
Last Modified बुधवार, 11 जुलै 2018 (16:06 IST)
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' हा सिनेमा येत्या १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉलेज तरुणाईची रंगीत दुनिया, तसेच त्यांच्या आयुष्यात हळूवार फुलत जाणारे प्रेमसंबंध मांडणारा हा सिनेमा, युवाप्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये आजच्या युवा पिढीचे भावविश्व आपणास पाहायला मिळते. या सिनेमात मैत्री, मौजमस्ती आणि प्रेम असे तरुणाईच्या आयुष्यातील विविध कंगोरे पाहायला मिळतात. चार मित्र आणि त्यांची धम्माल असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरला लोकांकडून तुफान प्रसिद्धी मिळत आहे. अल्पावधीतच या ट्रेलरला सोशल नेट्वर्किंग साईटवर भरपूर पसंती मिळत असून, ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेशजोडीची केमिस्ट्रीदेखील सिनेरसिकांना पसंत पडत आहे.
त्याशिवाय, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, जयराज नायर आणि अरुण नलावडे अशी कलाकारांची मांदियाळी या सिनेमात पाहायला मिळणार असून, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच 'ड्राय डे' या नावामुळे आणि नुकतेच प्रदर्शित झालेल्या या भन्नाट ट्रेलरमुळे सिनेमाची चर्चा अधिक होताना दिसून येत आहे.
dry day
अश्या या आगळ्यावेगळ्या दिवसाचे, म्हणजेच 'ड्राय डे' या सिनेमाचे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले असून, आजच्या नवतरुणांना हा 'ड्राय डे' हवाहवासा वाटेल, यात शंका नाही.
ड्राय डे चित्रपट कास्ट आणि क्र्यू :
दिग्दर्शन आणि कथा - पांडुरंग जाधव
निर्माता - संजय पाटील
निर्मिती संस्था - आनंदसागर प्रॉडक्शन
पटकथा आणि संवाद - नितीन दिक्षित
छायाचित्रण - दिवाकर नागराज
संगीत दिग्दर्शक - आश्विन श्रीनिवासन
गायक - बेनी दयाल, अॅशकिंग, जोनीता गांधी, विशाल दादलानी
छायाचित्रण - नितीन पवार
गीत - संभाजी भगत, जाई अत्रे, समीर सामंत
संकलन - अमित कुमार
कला दिग्दर्शक - सुमित पाटील
नृत्य दिग्दर्शक - राहुल ठोंबरे, राजेश बिडवे, रोहित
पब्लिसिटी डिझायनर - हर्ष हेडे ( हेल्व्हेटिका स्टुडिओज )
डिजिटल मार्केटिंग - अक्षय मुनोत ( डेल्टा इन्फोमिडिया )
चित्रपटाचे प्रमाणपत्र - U/A
dry day
कास्ट :
मोनालिसा बागल
रित्विक केंद्रे
पार्थ घाडगे
आयली घिया
चिन्मय कांबळी
योगेश सोहोनी
कैलाश वाघमारे
अरुण नलावडे


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

परत दिसला मौनी रॉयचा ग्लॅमर्स अंदाज, सोशल मीडियावर फोटोशूट ...

national news
टीव्ही शो 'नागिन'पासून चाहत्यांच्या मनात घर करणारी अॅक्ट्रेस मौनी रॉय तिच्या लुकमुळे ...

'अवनी', 'परी'ने ऋचाला दिली नवी ओळख

national news
ऋचा इनामदार... रुपेरी पडद्यावर नव्यानं नावारूपास आलेलं नाव. अनेक जाहिरातींतून झळकलेल्या ...

'भारत'चा दमदार ट्रेलर रिलीज

national news
अभिनेता सलमानचा आगामी चित्रपट भारतची आता भारतचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर ...

बॉलीवूडकडून गाण्यातून शहीदांना श्रद्धांजली अर्पण

national news
पुलवामा दहशतवादी हल्लात ४० भारतीय वीर जवान शहीद झाले. या शहीदांना श्रद्धांजली अर्पण ...

अरे देवा!

national news
नवरा बायको रस्त्यावरून मार्केट मध्ये खरेदी साठी चालत चालत जात असतात.