गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (14:43 IST)

प्रेक्षकांसाठी 'फुगे' सिनेमाचे प्रदर्शन लांबवले

देशातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी अवलंबिलेल्या ५००आणि १००० रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला चहूबाजूंनी संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. भारतातील आर्थिक उलाढालीसाठी महत्वपूर्ण ठरलेल्या या निर्णयाचा पडसाद समाजातील प्रत्येक क्षेत्रावर पडलेला दिसून येत आहे. याला मनोरंजन क्षेत्रदेखील अपवाद नाही. केंद्रसरकारच्या या धाडसी धोरणाला सकरात्मक प्रतिसाद देण्यासाठी तसेच रसिक प्रेक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी 'फुगे' या सिनेमाचे प्रदर्शन पुढे लांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होणारा हा सिनेमा काही आठवड्यांसाठी पुढे ढकलला गेला असल्याचे सिनेमाच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. 
 
अश्विन अंचन यांची निर्मिती आणि माय प्रोडक्शनच्या अनुराधा जोशी तसेच जीसिम्सचे अर्जुन सिंग ब-हान व कार्तिक निशानदार यांची सहनिर्मिती असलेला 'फुगे' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होईल. नोटाबंदीच्या या धोरणाचा परिणाम थोड्याफार प्रमाणात का असेना पण मनोरंजन क्षेत्रावर देखील पडला असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हा बदल भारताचे भविष्य घडवण्यास महत्वाचे ठरणार असल्याकारणामुळे आम्ही त्याचे स्वागत करत असल्याचे जीसिमचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन सिंग ब-हान यांनी सांगितले. 'नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रेक्षकांना १००० आणि ५०० च्या नोटा चलनात आणता येत नाहीये, पर्यायी नोटा बदलून घेण्यामध्ये प्रेक्षक व्यस्त असताना, सिनेमा प्रदर्शित करणे आम्हाला योग्य वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. 
 
'फुगे' हा सिनेमा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता ते सहज शक्य नाही. अशावेळी कोणताही सिनेरसिक 'फुगे' सिनेमा पाहण्यापासून वंचित राहू नये, यासाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी विचार करून सिनेमाचे प्रदर्शन पुढे लांबवले आहे. एस टीव्ही नेटवर्क्सचे इंदर राज कपूर प्रस्तुत, स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित तसेच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे या मराठीतील दिग्गज स्टारची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीची प्रसिद्धी लक्षात घेता निर्मात्यांचा हा निर्णय स्वागतःर्य ठरत आहे.