शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (10:52 IST)

'मानव्य' संस्थेला 'फुगे' च्या टीमने दिली सदिच्छा भेट

'फुगे' हे आनंदाचे प्रतिक असल्यामुळे लोकांना आनंदी राहण्याचा संदेश फुगे या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटाची टीम देत आहे, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष फुग्यांचे वाटप या सिनेमाची टीम करत आहे. याच योजनेअंतर्गत फुगेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील एच. आय.व्ही. पिडीत मुलांचे संगोपन करणाऱ्या मानव्य या एनजीओमध्ये सदिच्छा भेट दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या मुलांना गायक स्वप्नील बांदोडकरने गायनाचे धडे देखील दिले. पुण्यात नव्याने स्थापन झालेल्या त्याच्या म्युजीकल इंस्टीटयूट मधील एक प्राध्यापक महिन्यातून एकदा या संस्थेतील मुलांना गायनाचे धडे मोफत शिकवण्यास येईल, असे आश्वासन त्याने दिले, तसेच अगर मला वेळ मिळाल्यास मीदेखील इथे मार्गदर्शन देण्यास हजर राहत जाईल, असेही त्याने पुढे सांगितले. मानव्य संस्थेतील मुलांनी देखील आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत, मोठ्या उत्साहात फुगे टीमसोबत काही क्षण घालवले. अशाप्रकारे प्रेम आणि मैत्री यावर भाष्य करणारा हा सिनेमा मनोरंजनासोबतच आयुष्य स्वच्छंदी जगण्याचा सल्ला देखील देऊन जात आहे. 
 
प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी, मोहन जोशी, सुहास जोशी आणि आनंद इंगळे यांची देखील यात भूमिका असणार आहे. शिवाय बॉलीवूडचे दिग्दर्शक निशिकांत कामत यात खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
 
या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. 
 
'फुगे' या नावाने हा सिनेमा विनोदी आणि मनोरंजनाची खुमासदार मेजवाणी देणारा आहे, याचा अंदाज प्रथमदर्शनी आला असला तरी, यात नेमके काय आहे, याचे गुपित  येत्या १० फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. 
 
त्यामुळे स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे नव्हे तर स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी या नवीन दोस्तांचा हा गमतीशीर स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित सिनेमा प्रेमाची बॅकस्टोरी सांगण्यास सज्ज झाला आहे.