मातृत्वाच्या या धाडसाची गाथा,
आता लवकरच मोठ्या पडद्य्वावर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' या सिनेमाद्वारे आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. या सिनेमाची ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घोषणा करण्यात आली.

ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. मराठी चित्रपटनगरीत एकत्ररित्या उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या आदर्श मित्रांच्या यादीत प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. 'कच्चा लिंबू' या चित्रपटातून अत्यंत महत्वाचा सामाजिक विषय हाताळल्यानंतर, आता हीच जोडी 'हिरकणी' हा इतिहासकालीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत असल्यामुळे, रसिकांसाठी हि एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. हिरकणीच्या भूमिकेत कोणती 'नायिका' आहे, हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.