testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

थुकरटवाडीत कंगना रणावत

झी मराठीच्या
‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर
अभिनेत्री कंगना रणावत
आपल्या आगामी ‘रंगुन’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी येत आहे. कंगनाने थुकरटवाडीत हजेरी लावली होती. येत्या सोमवारी 20 फेब्रुवारीला रात्री 9.30 वाजटा हा भाग प्रसारित होणार आहे. यावेळी ‘क्वीन’ चित्रपटाची थुकरटवाडीच्या मंडळींनी सादर केलेली आवृत्ती बघून कंगनाही खळखळून हसली. याचसोबत या मंडळीसोबत कंगनाने ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर ताल धरत नृत्यही सादर केलं. विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन असलेला ‘रंगुन’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात कंगना मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे तर तिच्या सोबतीने शाहिद कपूर आणि सैफ अली खान असे दोन तगडे अभिनेते या चित्रपटात आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगना पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात हजर झाली.


यावर अधिक वाचा :