Widgets Magazine
Widgets Magazine

गणेश-अंबरची सुपरहिट जोडी 'अंड्या चा फंडा'द्वारे पुन्हा एकत्र...

शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:11 IST)

marathi movie

मराठी सिनेमातील पठडीबाहेरच्या आणि रिअलिस्टीक विषयांमुळे चर्चेत राहिलेली अंबर हडप-गणेश पंडित ही जोडी पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. 'बालक पालक' आणि 'यलो' सारख्या दर्जेदार विषयानंतर आता हे दोघे 'अंड्या चा फंडा' या सिनेमाद्वारे एकत्र येत आहेत. आशयपूर्ण कथानकासोबतच रसिकांचे मनोरंजन हा या हिट जोडीचा फॉर्म्युला त्यांच्या या आगामी सिनेमांत देखील वापरला गेला असल्याचे खात्रीलायक सांगता येईल. संतोष शेट्टी दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाचे अंबर-गणेश यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.
 
ह्या चित्रपटाविषयी बोलताना,  'आम्ही नेहमीच काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो, सिनेमे मोजके असले तरी चालतील, पण ते नाविन्यपूर्ण असायला हवेत असा आमचा अट्टाहास आहे. हा सिनेमादेखील असाच वेगळ्या धाटणीचा असल्यामुळे आम्हा दोघांना त्याची पटकथा लिहिण्याचा मोह आवरता आला नाही' असे अंबर - गणेश या जोडीने सांगितले. ह्या वेळी ह्या जोडीला एक नवा साथीदार येऊन मिळालाय. त्याच नाव श्रीपाद जोशी.
 
अध्यास क्रिएशन्सचे विजय शेट्टी निर्मित तसेच प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या सिनेमाच्या हटके नावामधूनच हा लहान मुलांवर आधारित असल्याचे कळते. दोन जिवलग मित्रांची धम्माल यात पाहायला मिळणार आहे. हि दोघे कशा पद्धतीने एक इच्छा पूर्ण करतात आणि त्या मार्गावर येणारी कोडी कशी उलगडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा सिनेमा ३० जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांवर भाष्य करणारे गाणे लवकरच प्रदर्शित

डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. नुसता ...

news

उन्हाळी सुट्ट्यांचा कौटुंबिक 'करार'

सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला की, अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज असतात. मात्र इंडियन ...

news

संस्कृती कला दर्पण गौरव पुरस्कार जाहीर

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करणा-या ...

news

'F.U.- Friendship Unlimited' चा टीझर लाँच

मुंबई- फ्रेशन लूक, न संपणारी एनर्जी, रोमान्स, तरुणाई चा एटिड्यूड आणि फुल ऑफ लाइफने ...

Widgets Magazine