testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मगरींनी घेरूनही ‘तो’चोर सहीसलामत सुटला

marathi movie
Last Modified मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (11:01 IST)
ठिकाण... चिपळूणच्या गांधारेश्वर मंदिराचा निसर्गरम्य परीसर....वशिष्ठी नदिच्या तीरावर वसलेलं टुमदार शंकर मंदिर आणि नदी किनाऱ्यावरचा घाट....घाटाच्या एका कोपऱ्यात असलेल्या जांभळाच्या डेरेदार वृक्षाची एक भली मोठी फांदी वीस-पंचवीस फुट उंचावरून नदीपात्रात हेलकावे घेत होती. आणि त्या फांदीवर एक तरूण घाईघाईने आणि महत्प्रयासाने वर चढून बसला होता. आधीच गावात चोर शिरल्याची कुजबुज होती. त्यात त्या फांदीवर घाईघाईने चढणारा तरूण पाहून, तोच चोर असल्याची काहीजणांनी आवई उठवली आणि बघता बघता घाटावर गर्दी झाली. इतकं असुनही एक पर्यटक तरूणी खाली नदीत एका नावेतून मुक्त विहार करत होती. त्या तरूणाचे हावभाव काही वेगळेच होत होते. त्या तरूणीकडे पाहून तो संवाद साधणार इतक्यात.....एका गावकऱ्याने ‘ती फांदी कमकुवत असून तो केव्हीही खाली पडेल आणि पाण्यात मगरी असल्याचे ओरडून सांगितले. झालं! त्या तरूणाच्या काळजात धस्सं झालं. मदतीच्या अपेक्षेने तो साद घालणार...इतक्यात ‘कट ईट’असा जोरदार आवाज आला.
गावकऱ्याच्या नजरा मागे वळल्या...दुरवर एका उंचवट्यावरून तो आवाज आला होता. तेव्हा गावकऱ्यांना समजले की तिथे चरणदास चोर चित्रपटाची शुटींग सुरू आहे. तो झाडावर चढलेला तरूण, चित्रपटाचा मुख्य नायक ‘चरण’म्हणजे अभय चव्हाण आणि पाण्यात नावेत विहार करणारी तरूणी म्हणजे अभिनेत्री सोनम पवार होती. दिग्दर्शक श्याम महेश्वरी यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. मगर नावेच्या जवळ येऊ नये म्हणून काही गावकरी दुसऱ्या नावेतून पाण्यात उतरले आणि सीन पुन्हा सुरू झाला.
सायलेन्स....रेडी....रोल कॅमेरा.....ॲण्ड ॲक्शन! असा आदेश झाला. झाडावर बसलेल्या अभयची पुन्हा बोलती बंद झाली. खरंच नदीपल्याड किनाऱ्यावर एक मगर हालचाल करताना त्याला दिसली. पण, तो काहीही बोलला नाही. दिग्दर्शकाच्या ही गोष्ट लक्षात आली. कारण, कॅमेऱ्यातून ती मगर स्पष्टपणे दिसत होती. तो सीन कसाबसा पूर्ण झाला. उर्वरीत सीन साठी ‘चरण’म्हणजे अभय चव्हाणला पाण्यात उतरायचे होते. आता मात्र खरी पंचायत होती. रोमँटीक सीन होता. सीन पूर्ण करणं गरजेचं होतं. दिग्दर्शक श्याम माहेश्वरी व क्रीएटिव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे दोघांनी मगरींची चाहूल घेण्यासाठी कॅमेऱ्यात कुठेही दिसणार नाही अशा पद्धतीने नावेभोवती गावकरी आणि प्रोडक्शन टीमचे कडे निर्माण केले. नायिका सोनम पवार बिंधास्त होती कारण ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. पण, अभय चव्हाणची मात्र पाचावर धारण बसली होती. त्यात रोमँटीक सीन. अशा अवस्थेत रोमँटीक अभिनय करायचा तरी कसा? असा त्याला प्रश्न पडला. रीटेकवर रीटेक होऊ लागले. “झक मारली, आणि हा चित्रपट स्विकारला!” अशा भावनेतून कसाबसा अभयने सीन पूर्ण केला.
पाण्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी सर्वच जण नाव जोरात हाकू लागले. इतक्यात, तीन लहान मगरी पाण्यावर तरंगताना दिसल्या. पण, त्या मगरींची काहिच हालचाल नव्हती. हे पाहून, कसेबसे सर्वजण पाण्याबाहेर आले आणि संपूर्ण टीमने सुटकेचा निश्वास टाकला. पाण्याबाहेर आल्यावर अभयने हा सर्वप्रकार अभिनेत्री सोनमला सांगितला. तेव्हा तीची प्रतिक्रीया ऐकून सर्वानांच हसू फुटलं.....”कदाचित, मगरींचं जेवण झालेलं असावं आणि त्यांना समजलं असेल तू खरा चोर नाहीस ते”. अशा रीतीने मगरींच्या तावडीतून चरणदास चोर आणि चोरनी दोघेही बचावले.
कोकणच्या निसर्गसंपन्न वातावरणात चित्रीत झालेला, युनिट प्रोडक्शन निर्मित खुमासदार विनोदी चरणदास चोर हा चित्रपट येत्या 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.


यावर अधिक वाचा :

लक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित

national news
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...

पुन्हा बेबफिल्म नाही

national news
'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...

गणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...

national news
कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...

national news
दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

national news
जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...