testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

marathi movie
Last Modified शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (11:39 IST)
तमाम मराठी वाचकांचे आवडते लेखक म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट ४ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार असून पु. ल. देशपांडे यांच्या ९९व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे.

महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘भाई…व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटातून भाई आणि सुनीताबाई यांच नातं, पु.लंची मित्रमंडळी अशी अनेक पात्र आपल्यासमोर येणार आहेत. या चित्रपटातून जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना दिसणार आहेत.
‘हंटर’, ‘वायझेड’ या चित्रपटांत मुख्य भूमिकेत झळकलेला अभिनेता सागर देशमुख पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर ‘आपलं माणूस’, ‘टेक केअर गुड नाईट’, ‘अस्तू’ अशा चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री इरावती हर्षे सुनीताबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

सुपर हिरोचा किमयागार काळाच्या पडद्याआड

national news
लहान मुलांपासून ते मोठ्या मानसांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या सुपहिरोजची निर्मिती करणारे ...

सध्या लग्नाचा इरादा नाही!

national news
दीपिका पदुकोण व रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा व निक जोनास पाठोपाठ सुश्मिता सेन व रोहन ...

पुणेकरांची दिवाळी

national news
दोस्त : तुम महाराष्ट्रीयन लोग दिवाली कितने दिनो तक मनाते हो ? पुणेकर : मोती साबण संपे ...

'लव्ह यू जिंदगी' चित्रपटाचा टीझर

national news
तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणार्‍या अनिरुद्ध दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन ...

सावत्र आईच्या भावाशी लग्न करायचे आहे सारा अली खानला

national news
नुकतेच कॉफी विद करण सीझन 6चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात सैफ अली खान आणि त्याची मुलगी ...