testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'अ बॉटल फूल ऑफ होप' ठरतोय 'पिप्सी' सिनेमाचा ट्रेलर

maithili and shah pipsi
Last Modified बुधवार, 27 जून 2018 (15:55 IST)
लहान मुलांच्या निरागस विश्वाची रंजक सफर घडवून आणणारा 'पिप्सी' हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राला 'अ बॉटल फूल ऑफ होप' देण्यास येत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या या सिनेमाचा, अंधेरी येथील हॉली फॅमिली हायस्कूलमध्ये नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. चानी आणि बाळूच्या मैत्रीवर आधारित असलेल्या 'पिप्सी' सिनेमाच्या या ट्रेलरचा बच्चेकंपनीनेदेखील मनमुराद आनंद लुटला. मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या सिनेमातील प्रमुख बालकलाकारांसोबत पार पडलेल्या या ट्रेलर लाँच कार्यक्रमामध्ये, या दोघांनी शाळकरी मुलांसोबत
गप्पागोष्टी करत, त्यांच्यासोबत काही खेळदेखील खेळले.
marathi movie pipsi
ग्रामीण भागातील दोन छोट्या मुलांचे भावविश्व मांडणारा 'पिप्सी'चा ट्रेलर लक्षवेधी ठरत आहे. 'राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा माणसाचा जीव माश्यात असतो' असा समज करून, दुर्दम्य आजाराने ग्रासलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी माश्याच्या शोधात निघालेली चानी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच, आपल्या मैत्रिणीला मदत करणारा बाळूदेखील यात असून, 'पिप्सी' नामक माश्याची गोष्ट या सिनेमात असल्याचे आपणास दिसून येते. समाजातील समस्येकडे लहान मुलांचा पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष 'पिप्सी'च्या ट्रेलरमध्ये अगदी रंजकपद्धतीने मांडण्यात आला आहे.
सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' सिनेमातील गाणी ओमकार कुलकर्णी यांनी लिहिली असून देबारपितो साहा यांचे संगीत त्यांना लाभले आहे. लहानग्यांच्या निरागस डोळ्यातून सादर होत असलेला 'पिप्सी' हा सिनेमा केवळ बच्चेकंपनीसाठी नव्हे तर प्रौढ प्रेक्षकांसाठीदेखील आशयसमृद्ध ठरेल, अशी आशा आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

लिसा हेडनचा जेम्स बांडचा अवतार

national news
चित्रपटात भले लिसा हेडन फार कमी दिसते, पण सोशल मीडियावर सतत ती सक्रिय असते. येथे ...

अनेक चुकले, तुम्ही ओळखा हा कोण आहे आता तो मोठा अभिनेता आहे

national news
हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळींचे अनेक फॅन आहेत. अनेकांना तर त्यांच्या व्यक्तिगत ...

धडकी भरवणारा 'जजमेंट'

national news
ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा 'जजमेंट' या ...

जेव्हा रविवारी नवरा केस कापून येतो

national news
रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो: बघ मी तुझ्या पेक्षा 10 वर्षांनी लहान ...

काजोल ने न्यासाच्या बॉलीवूड डेब्यूबद्दल काय म्हटले

national news
अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासा ने काही दिवसांअगोदरच आपला 16वा वाढदिवस साजरा केला आहे. ...