testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: 'कासव'ने जिंकली शर्यत

kasav
हल्ली मराठी सिनेमाचा दबादबा बघायला मिळत आहे. यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ह्या वर्षीही मराठीचा झेंडा फडकला आहे. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित कासव या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्काराची शर्यत जिंकली आणि अव्वल क्रमांकाचं सुवर्णकमळ पटकावलं. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.
या चित्रपटात नैराश्यातून बाहेर कसे पडावे हे अगदी वेगळ्या प्रकाराने सांगण्यात आले आहे. आयुष्यातील वेगवेगळ्या मुक्कामावर असलेले लोकं त्यांची धडपड, त्याच्या वेदना आणि अहिंसक कासवांची पिल्लं वाचवण्याची धडपड, याभोवती सिनेमा गुंफण्यात आला आहे.
नैराश्यात गेलेला व्यक्ती कोणत्याही प्रकाराच्या हल्ल्याला घाबरून स्वत:चे अवयव कवचाच्या आत सामावून घेणार्‍या कासवाप्रमाणे वागतो. अशात त्याला सांभाळून घेण्याची, माया देण्याची गरज असते. तसेच या चित्रपटात नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी भाष्य केले गेले आहे. मोहन आगाशे, इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम यांनी या चित्रपटात काम केले आहे.

याशिवाय दशक्रिया हा मराठीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. संदीप पाटील या नवोदित दिग्दर्शकाचा हा पहिला प्रयत्न आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आधारित पटकथेचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे यातील भूमिकेसाठी मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेच्या पुरस्कार मिळाला आहे. तसेच प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या आणि राजेश मापुस्करांच्या ‘व्हेंटीलेटर’ने ही आपला ठसा उमटवत तीन पुरस्कार मिळवले. व्हेंटीलेटर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलन म्हणून रामेश्वर भगत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंगसाठी आलोक डे यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. तर ‘सायकल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून सचिन लोवलेकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.


यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...