बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2017 (09:58 IST)

प्रयोगादरम्यान कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुण्यातील  टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरी दरम्यान सागर चौघुले (३८ ) या  कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सागर हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा सख्खा भाचा असून त्याच्या पश्चात आई, एक भाऊ, वहिनी, पत्नी आणि दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे.  शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित ‘अग्निदिव्य’ हे नाटकात शाहू महाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच सागरचा मृत्यू झाला.

पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरु होती. कोल्हापूरचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला. नाटकाच्या सुरवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमीकेत असलेल्या सागर चौघुले यांनी प्रक्षकांची वाहवा मिळविली होती. मात्र, नाटकाचा मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणतानात सागरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला. सहकलाकारांनी तातडीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुना हॉस्पिटलला हलविण्यात आले. पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सागरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.